मालेवाडा पोलिस मदत केंद्रातील पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल आला कोरोना पाॅझिटीव्ह


- एकूण रुग्णसंख्या झाली ५११ तर २५४ जण झाले कोरोनामुक्त , सक्रीय रुग्ण २५६
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात मागील २४ तासाात एकाचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. कुरखेडा तालुक्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केलेल्या मालेवाडा पोलिस मदत केंद्रातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल आज कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता ५११ झाली आहे तर आतापर्यत २५४ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णामळे जिल्हयातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या आता २५६ झाली तर जिल्हयात एकाचा मृत्यू झाला आहे.
News - Gadchiroli | Posted : 2020-07-26