महत्वाच्या बातम्या

 दुचाकी वाहनासह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : ब्रह्मपुरी येथून दुचाकी वाहनाने दारूची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा कारवाई करत दारुची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या देसाईगंज पोलिसांनी मुसक्या आवळत दुचाकी वाहणासह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजय तुकाराम बुल्ले (45) रा. मोहटोला, लखबीर सिंग रणबीर सिंग बावरी (25) रा. गोकुल नगर असे आरोपींची नावे आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. मात्र शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातून छुप्या मार्गाने दारूची तस्करी केल्या जाते. ब्रम्हपुरी येथून दारुचे वाहतूक होत आहे. अशी गोपनीय माहिती देसाईगंज पोलिसांना मिळाली असता, पोलीस निरीक्षक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पोलीस अमलदार निकलेश सोनवणे यांनी पटेल लॉन जवळ सापळा रचला असता, बजाज कंपनीची डिस्कवर वाहन क्रमांक MH 40 AE 2824 मध्ये टायगर ब्रँड देशी दारुच्या ९० मिली मापाच्या १०० निपा किंमत १० हजार रुपये व वाहनाची किंमत ६० हजार रुपये असा एकूण ७० हजार रुपयाच्या माल अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन देसाईगंज येथे अप क्र.०५१६/२०२२ कलम ६५ (A), ८३, ९८ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos