शिर्डी बसस्थानकावर चोरी करणाऱ्या श्रीरामपुरच्या दोन महिलांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / शिर्डी  :
येथील बसस्थानकावर औरंगाबाद कडे जाण्यासाठी निघालेल्या दोन महिलांकडील  नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख रक्कम   चोरी जाण्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी  घडली होती.  यात औरंगाबाद येथिल रंजना लक्ष्मण रत्नपारखी व आशा दिपक शिरोळे या दोघींचा ऐवज चोरी गेला होता.  त्यांच्या तक्रारीवरुन शिर्डी पोलीसांनी  भा.द.वि ३७८/३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. बसस्थानकावरील सी.सी.टिव्ही फुटेज तपासुन पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  आशोक खरात यानी तपासाला सुरवात केली असता या चोरीत श्रीरामपुर येथिल महिलांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.  शिर्डी पोलीसांनी श्रीरामपुर येथे जाऊन या गुन्ह्यातील संशयित महिला शोभा शंकर दामोदर व सिंधु शंकर गायकवाड वार्ड  क्रमांक २ रा. श्रीरामपुर या महिलांना अटक केली आहे. 
 या दोन्ही महिलांनी आपण चोरी केली असल्याची कबुली दिली असुन वरील गुन्ह्यात अटक करुन मुदेमाल हस्तगत करण्याची कारवाई उशीरा पर्यत सुरु होती.  गेल्या काही दिवसात बसस्थानकावर चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. श्रीरामपुर येथील काहि महिला चोरी करुन तात्काळ पळुन जात असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले होते.  शिर्डी पोलीसांच्या या पथकाने चोरी झालेल्या अशा चोऱ्या उघडकीस अण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.  त्या साठी सी.सी.टिव्हीची मोठी मदत झाली.  तपासात आनखी  गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.  या कारवाईत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुणे पो.काॅ. प्रसाद साळवे,  नितीन शेलार, अजय अंधारे, बाळकृष्ण वर्पे, किरण कुऱ्हे. संदिप चव्हाण, राणी वलवे, बबन माघाडे यांनी या कारवाईत भाग घेतला होता.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-04


Related Photos