राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या भरारी पथकाने केला १६ लाख ६९ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / यवतमाळ :
०१ ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या विभागीय भरारी पथकाने, यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात गस्तीवर असतांना मिळालेल्या गुप्त खबरेवरून कारवाई केली असून १६ लाख ६९ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्या आला आहे. 
वणी येथील वॉर्ड क्र. १९ सम्राट अशोक परिसरात अवैध देशी व विदेशी मद्य साठा असून त्यांची अवैध वाहतूक व पुरवठा केली जाते अशी खात्रीलायक माहिती  प्राप्त झाल्यावरून  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी  छापा टाकला.  या ठिकाणी  एक महिंद्रा कंपनीचे बोलेरो पीक अप पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन क्र. एम.एच. २९ एटी ६३८ व एक महिंद्रा कंपनीची बोलेरो मॅक्सी ट्रक वाहन क्र. एमएच २९ एटी ००१८ अश्या दोन्ही चारचाकी वाहनामध्ये खालील  दारूसाठा  मिळून आला. १८० मिली क्षमतेच्या रॅकेट देशी दारू संत्रा या ब्रॅण्डच्या ६९ सीलबंद पेट्या ज्यात ३३१२ सीलबंद व ९० मिली क्षमतेच्या १७९ सीलबंद पेट्या ज्यात १७९०० सीलबंद बाटल्या व विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या मॅकडोवेल नो. १ रिझर्व्ह व्हिस्की या ब्रॅण्डच्या १५ सीलबंद पेट्या ज्यात ७२० व ऑफिसर चॉईस व्हिस्की ब्रॅण्डच्या ११ सीलबंद पेट्या जात ५२८ सीलबंद बाटल्या मिळून आल्या.  असा एकूण रुपये १६ लाख ६९ हजार ५५४ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर ठिकाणी कोणीही इसम मिळून न आलेल्या अज्ञात इसम फरार व इतर त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा चे कलम ६५ (ए) (ई), ८१,८३ अन्वये गुन्हा क्रमांक २५६/२०१८ व गुन्हा क्रमांक २५७/२०१८ नोंदविण्यात आला. सदर  कारवाही राज्य उत्पादन शुल्क, नागपूर च्या विभागीय उप आयुक्त उषा वर्मा    यांनी  कारवाई केली. कारवाई मध्ये दुय्यम निरीक्षक विशाल कोल्हे, तसेच जवान प्रकाश मानकर, राहुल सपकाळ, गजानन वाकोडे व विनोद डुंबरे, प्रशांत घावळे यांनी कारवाई भाग घेतला.  पुढील तपास निरीक्षक, डी.एस. जानराव, व दुय्यम निरीक्षक एम.के. मते, हे करीत आहेत. 

   Print


News - Rajy | Posted : 2018-10-03


Related Photos