गोविंदपूरजवळ कार - दुचाकीच्या अपघातात दोन युवक ठार


- समोरासमोर धडक बसल्याने घडला अपघात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाल्याची घटन आज १ आॅक्टोबर रोजी दुपारी ३.३०  वाजताच्या सुमारास चामोर्शी मार्गावरील गोविंदपूरजवळ घडली.
अमित निमाई मंडल (२६) रा. नागेपल्ली आणि लक्ष्मण राम चाचरकर (२८) रा. मानपल्ली असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार अमित आणि लक्ष्मण एमएच ३३ एस ५०१७ क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोली येथून चामोर्शीकडे जात होते. दरम्यान चामोर्शी मार्गाने गडचिरोलीकडे येत असलेल्या एमएच ३३ ए ५७१२ क्रमांकाच्या कारची दुचाकीला समोरून जोरदार धडक बसली. अपघात इतका भिषण होता की दुचाकीचा चेंदामेंदा झाला. कारचासुध्दा समोरील भाग पूर्णतः क्षतीग्रस्त झाला. दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला जावून कोसळली. अपघातग्रस्त कार गडचिरोली येथील माणिक जुमनाके यांच्या मालकीची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस हवालदार मुबारक शेख करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-01


Related Photos