महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली आगाराची बसेस रामभरोसे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : वाट पाहीन पण, एसटीनेच जाईन, असा लौकिक प्रवाशांमध्ये कायम ठेवून असलेली एसटी सर्वसामान्यांची संजीवनी आहे. मात्र,  सुरक्षितेबाबत एसटीच्या गडचिरोली आगारात उदासीनताच असल्याचे दिसून येते. 

गडचिरोली आगारातील गडचिरोली वरून कोरचीला येणारी दुपारची दोनची बस ही बेळगाव घाटलगत पंचर झाली. असे समजतात प्रवाशांनी चालकाला विचारणा केली असता, बस मध्ये स्टेपनी नाही, म्हणून सांगण्यात आले. सदर बस बेळगाव घाटाजवळ पंचर झाल्यामुळे सर्वत्र घंनदाट जंगल असल्यामुळे प्रवाशांची ताळांबर उडाली. तसेच प्रवाशांनी चालकास विचारले. कोरचीला जायचे कसे? याबाबत चालक व वाहक यांनी आपण आपली व्यवस्था करावी. कारण एसटीमध्ये स्टेपनी नसल्यामुळे त्यांना स्टेफनी करिता कोरचीला जाऊन पुन्हा वापस यायला कमीत, कमी एक ते दीड तास लागेल, असे उत्तर दिले. यामुळे बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली, ज्या मार्गावर बस पंचर झाली. त्याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांना बऱ्याच दूर पायी जावे लागले. व मिळेल त्या वाहनाने कोरचीपर्यंत याचे लागले. सदर या महामार्गावर घनदाट जंगल असून, या बस मध्ये प्रवासी एक वृद्ध स्त्री व दोन महिला व तीन तरुण होते. सदर वृद्ध महिला दवाखान्यातून सुट्टी घेऊन घरी येत होती. सदर याच मार्गावरून जातांना अनेक जंगली प्राणी आढळून येतात. समजा एखाद्याचा प्राण्यांमुळे घात झालाच असतात, तर जबाबदार कोण? असा प्रश्न त्या प्रवाशांच्या परिवारातून करण्यात येत आहे.  

कोरचीला येणारी गडचिरोली आगारातील बसेस हे नेहमीच काही ना काही कारणास्तव बसेस मध्ये बिघाड होत असते. यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच बसमध्ये स्टेपनी नसणे, ही अत्यंत अशोभनीय बाब असून गडचिरोली आगारातून जाणाऱ्या बस हे अतिशय दुर्गम भागात जात असून अशा बसेसला स्टेफनी नसेल, तर या आगारातील बसेस तसेच अधिकारी कुचकामी नाही काय? असा प्रश्न नागरिकाकडून निर्माण होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos