सुधारगृहातील सुरक्षारक्षकावर हल्ला करून ११ अल्पवयीन फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
  राजधानी दिल्लीत गेट परिसरात असलेल्या बाल सुधारगृहातून ११ मुलं पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. काल बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण दिल्ली परिसरात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, अल्पवयीन मुलांनी सुरक्षारक्षकावर हल्ला केला आणि त्यानंतर तेथून पळून गेले. यावेळी, दोन सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी सुरक्षारक्षकांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अल्पवयीन मुलांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशा बाल गुन्हेगारांना येथे ठेवण्यात आले होते ज्यांनी बर्‍याच वेळा गुन्हे केले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.आठ वर्षांपूर्वीही या बाल सुधारगृहात अल्पवयीन मुलांनी गोंधळ उडवून घरात आग लावली होती. यासह काही अल्पवयीन मुलांनी किशोर कोर्टातही आग लावली. यावेळी मालमत्तेचे बरेच नुकसान झाले.  Print


News - World | Posted : 2020-04-23


Related Photos