महत्वाच्या बातम्या

 दिवाळीनिमित्त ३ हजार ६९० माथाडी कामगारांना ६ कोटी ७४ लाख बोनस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्य सरकारच्या कामगार मंत्रालयातंर्गत नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, नागपूर मार्फत कार्यरत असलेल्या ३ हजार ६९० माथाडी कामगारांना दिवाळीनिमित्त ६ कोटी ७४ लाख ७२ हजार ५९७ रुपयांचे सानुग्रह अनुदान २६ ऑक्टोबर रोजी प्रत्येक माथाडी कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यांत आलेले आहे.

नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, नागपूरचे अध्यक्ष संतोष कोकाट व सचिव उत्कर्ष मोराणकर यांनी अप्पर कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी मंडळात नोंदीत कार्यरत एकूण ३ हजार ६९० माथाडी कामगारांना सन २०२५-२०२६ या वर्षाकरीता एकूण ६ कोटी ७४ लाख ७२ हजार ५९७/- बोनस (सानुग्रह अनुदान) वाटप करण्यात आला. माथाडी कामगारांना दिवाळी पुर्वी बोनस मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.





  Print






Related Photos