महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज पदस्पर्शभूमी दीक्षाभूमी येथे ६६ वा महापरिनिर्वाण दिन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / देसाईगंज : समाजात धर्म निरपेक्षता रुजावी वंचितांना न्याय मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य महान आहेत. म्हणूनच ते सर्वार्थाने महापुरुष आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी असल्याचे मत आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंज येथील पदस्पर्शभूमी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमा प्रसंगी आमदार कृष्णा गजबे, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, प्रा.डॉ. शंकर कुकरेजा, प्रा.डॉ. विनायक तुमराम आदिवासी सुप्रसिद्ध साहित्यिक, प्रा. डॉ. मोरेश्वर नगराळे कोकण कृषी विद्यापीठ दापोली, प्रा. प्रदीप विठ्ठल हिरापुरे, प्रा.मिलिंद रंगारी, प्रा.डॉ. स्निग्धा कांबळे, सुनील कुमरे, विजय मेश्राम, चंदू राऊत, मारुती जांभुळकर, वंदना धोंगडे, उद्धव खोब्रागडे, मोरध्वज शिपोलकर, साजन मेश्राम, महेंद्र सहारे, संजय मेश्राम, जगदीश रामटेके, नरेश वासनिक आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos