मुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन अमृत रंजन पूल स्फोटक लावून उडवला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ब्रिटिशकालीन अमृत रंजन ब्रिज स्फोटक लावून जमीनदोस्त करण्यात आला आहे . स्फोटकांच्या स्फोटानंतर काही क्षणात हा पूल उद्ध्वस्त झाला आणि त्या जागेवर सर्वत्र केवळ धुरळा उडाला. त्यामुळे हा ब्रिटिशकालीन अमृत रंजन पूल अखेर इतिहासजमा झाला आहे. सुरुवातीला पुलाच्या कमानी पाडण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण पूल जमीनदोस्त करण्यात आला.
या ब्रिटिशकालीन ब्रिज खालील द्रुतगती मार्गावर वळण आणि रुंद रस्ता असल्याने  या परिसरात अपघातांचे  प्रमाण वाढलं होतं. हा भाग अपघात प्रवण क्षेत्रच बनल्यानं अखेर प्रशासनाने तो पाडण्याचा निर्णय घेतला. हा पूल पाडण्याचं आधीपासून नियोजन सुरु होतं, मात्र इतरवेळी वाहनांच्या गर्दीमुळे अडचण येत होती. अखेर लॉकडाऊनच्या काळाचा उपयोग करुन हा पूल जमीनदोस्त करण्यात आला. स्फोटानंतर मुंबई-पुणे महामार्गावर सर्वत्र मलबा आणि राडारोडा दिसत होता. यानंतर प्रशासनाने रस्त्यावरील मलबा हटवण्याचे काम सुरु केलं आहे. या पुलाचे उर्वरित अवशेष देखील पाडण्याचं काम सुरु आहे.
४ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यानच्या काळात हा संपूर्ण पूल हटवण्याचं काम सुरु राहणार आहे. यासाठी यापुढेही स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.   Print


News - Rajy | Posted : 2020-04-05


Related Photos