महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही पंचायत समितीतर्फे महापरिनिर्वाणदिनी डॉ. आंबेडकरांना वाहिली आदरांजली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाहीच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे जनक व स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सभागृह सिंदेवाही येथे नुकतेच करण्यात आले .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवर्ग विकास अधिकारी अक्षय शुक्रे होते. तर अतिथी पशुधन विकास अधिकारी डॉ. विनोद सुरपाम उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मेणबत्ती प्रज्वलन व माल्यार्पणाने आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी गटविकास अधिकारी शुक्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाच्या माध्यमातूम एससी., एसटी., ओबीसी व महिलांचे अधिकार या क्षेत्रात दिलेल्या महत्पूर्ण योगदानावर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणतज्ञ प्रा. भारत मेश्राम यांनी केले. तर संचालन व आभार मनोज अलोणे यांनी मानले. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सर्वअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता डा .बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय व बिरसा मुंडा यांच्या जयघोषाने करण्यात आले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos