दहावीचा पेपर पेपर पुढे ढकलला : ३१ मार्च नंतर पेपरची तारीख जाहीर होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे अशी घोषणा नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पेपर कधी घ्यायचा ते ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. मात्र आता दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे. नवी तारीख ३१ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे  Print


News - Rajy | Posted : 2020-03-21


Related Photos