दुचाकी मोहाच्या झाडावर आदळली : शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

- पद्मारा तलावाजवळील वळणावर अपघात; शेतावरून घरी परतताना दुर्घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पवनी तालुक्यातील शेलारी ते शिरसाळा मार्गावर पद्मारा तलावाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अंकोश रामदास दडमल ४८ वर्षे रा. शिरसाळा, ता. पवनी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
अंकोश दडमल हे शेलारी शिवारातील शेतावरून दुचाकीने घरी परत जात होते. दरम्यान, पद्मारा तलावाजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोहाच्या झाडावर जोरात आदळली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मृतकाचे भाऊ जयघोष रामदास दडमल ३७ वर्षे रा. शिरसाळा यांच्या तक्रारीवरून पवनी पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार रोशन फळणीकर करीत आहेत.




Petrol Price




