जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एका वर्षात जवळपास १४२ दहशतवाद्यांचा खात्मा


वृत्तसंस्था / श्रीनगर :  जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एका वर्षात जवळपास १४२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक आर आर भटनागर यांनी दिली आहे. काश्मीर खोऱ्यात अद्याप २०० ते २५० दहशतवादी सक्रिय असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
महासंचालक भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ - १७ शी तुलना करता काश्मीरमध्ये कायदा-सुव्यवस्था सुधारली आहे. तसंच जवान जखमी होण्याची आकडेवारीही कमी झाली आहे.  तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भर्ती होण्यापासून रोखण्यासाठी ‘मददगार’ हेल्पलाइन सुरु करण्यात आली होती. यावर गेल्या एका वर्षात तब्बल अडीच लाख फोन आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दहशतवादी हताश झाल्याने निशस्त्र सुरक्षा जवान आणि त्यांच्या कुटुंबांवर हल्ला करु लागले होते असं त्यांनी सांगितलं आहे.   Print


News - World | Posted : 2018-08-25


Related Photos