ऊर्जानगर येथे धनोजे कुणबी समाजाचा कोजागिरी स्नेहमिलन सोहळा उत्साहात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील धनोजे कुणबी समाजाच्या वतीने ३० ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्नेहबंध सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध उपक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण येरगुडे होते. प्रमुख अतिथी म्हणून धनोजे समाज मंडळ, लक्ष्मीनगर, चंद्रपूरचे अध्यक्ष श्रीधर मालेकर, सुधाकर काकडे, ऊर्जानगर ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजुषाताई येरगुडे, चंद्रपूर वीज केंद्र कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोबडे, सीटीपीएस ग्राहक कर्मचारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिवाकर बोबडे, आशिष गोवादिपे आणि विनोद ताजने उपस्थित होते.
यावेळी श्रीधर मालेकर यांनी समाजाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत सद्यस्थितीवर मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर विचार मांडत सामाजिक एकता आणि संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येकाने एकजुटीने योगदान द्यावे, असे प्रतिपादन अध्यक्ष प्रवीण येरगुडे यांनी केले.
कोजागिरी सोहळ्यानिमित्त लहान मुलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत झाडे यांनी केले, तर सुयोग वऱ्हाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे पदाधिकारी राजू वाढई, नागो सोमलकर, निकेश कुरेकर, ईश्वर झाडे, गणेश सूर, विलास टोंगे, भास्कर येरगुडे आणि देवानंद वैद्य यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजातील सर्व सदस्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. अशी माहिती देवराव कोंडेकर यांनी दिली.




Petrol Price




