महत्वाच्या बातम्या

 पदवीधर मतदारसंघ निवडणूक काळात विविध बाबींवर निर्बंध लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र विधानसभेच्या पदवीधर मतदारसंघाचा द्विवार्षिक  निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार विविध बाबीवर निर्बंध लागू करण्यात आले आहे.

जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने  धरणे, आंदोलने, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहे.

तसेच सदर ठिकाणी सभा घेणे, आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूक संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट, कटआऊट, पेंटीग्स, होर्डींग्ज लावणे, निवडणुकीविषयक घोषवाक्य  लिहिणे किंवा आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल, अशी कृती करणे या बाबींवर निर्बंध लावण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशात नमूद केले आहे.





  Print






Related Photos