बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन


- २ ते ८ ऑक्टोंबर कालावधीत वन्यजीव सप्ताह
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने २ ते ८ ऑक्टोंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करुन राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ २ ऑक्टोंबर रोजी जंगल सफारीचे उद्घाटन करुन होणार आहे. वन्यजीव सप्ताहात नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
२ ऑक्टोंबर रोजी जंगल सफारीच्या उद्घाटनानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नवीन बोर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उदघाटन, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या चित्रफितीचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑक्टोंबर रोजी शाळांमध्ये वन्यजीव विषयावर इयत्ता १ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नोत्तरे स्पर्धा, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण व वनसृष्टी बदल जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७. ३० ते ९.३० वाजता पर्यंत शालेय विद्यार्थी व पक्षीप्रेमींकरीता पक्षी निरिक्षण, ५ ऑक्टोंबर सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत वर्धा ते बोरधरण बाईक रॅली व वनपरिक्षेत्रधिकारी हिंगणी ते बोरधरण सायकल रॅली. अधिकारी व कर्मचारी गाईड, जिप्ती चालक तसेच स्थानिक रहिवाशी यांचेकरीता आरोग्य तपासणी शिबिर व पीआरटी व आरआर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
६ ऑक्टोंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिडा स्पर्धा, कर्मचारी, गाईड, जिप्सी चालकांकरीता फोटोग्राफी स्पर्धा, ७ ऑक्टोंबर रोजी गवत कुरण विकास कार्यशाळा व महिला सशक्तीकरण कार्यशाळा. ८ ऑक्टोंबर रोजी बक्षिस वितरण, स्वयंसिध्द बचतगटाद्वारे उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांनी कळविले आहे.




Petrol Price




