महत्वाच्या बातम्या

 प्रियदर्शनी सोसायटी व वाकडी चाळ पुनर्विकासाला गती द्यावी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंथा / मुंबई : लोकमान्य नगर, दादर येथील प्रियदर्शनी सोसायटी आणि प्रभादेवी येथील वाकडी चाळ सोसायटीच्या पुनर्विकासातील अडचणी दूर करून कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दोन्ही पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. प्रियदर्शनी सोसायटीच्या पुनर्विकासाबाबत विकासक आणि रहिवाशांमध्ये झालेल्या करारातील मुद्दे लक्षात घेऊन म्हाडाने आपल्या स्तरावर आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

वाकडी चाळ सोसायटीच्या पुनर्विकासासाठी विकासक आणि रहिवासी यांच्यात समन्वय घडवून पुनर्विकासाची कार्यवाही पुढे न्यावी, असे निर्देशही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिले.  यावेळी गृहनिर्माण विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या, निवासी मुख्य अभियंता रूपेश राऊत, म्हाडाचे कार्यकारी अभियंता रामटेके, संबंधित सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि विकासक उपस्थित होते.





  Print






Related Photos