सहकारी संस्थेसंदर्भात हरकती असल्यास २९ ऑक्टोबरपुर्वी सादर करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजूरा माँ भवानी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमि. राजूरा या संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधक, सहकारी संस्था राजुरा या कार्यालयास प्राप्त झाला आहे.
सदर संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयास २९ ऑक्टोबर २०२६ पुर्वी सादर कराव्यात किंवा ३० ऑक्टोबर,२०२६ रोजी दुपारी १२ वाजता सुनावणी ठेवण्यात आली असून सुनावणीच्या वेळी हरकती दाखल कराव्यात.
या कार्यालयात हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास संबंधितांना काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी, असे सहायक निबंधक, सहकारी संस्था (राजुरा) आर. डी. कुमरे यांनी कळविले आहे.




Petrol Price




