योगी सरकार शहरांनंतर आता नद्यांचीही नावं बदलणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लखनऊ :
उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक शहरांची आणि ठिकाणांची नावे बदलली आहेत. इलाहाबादचे प्रयागराज, मुगलसराय जंक्शनचे पंडित दीन दयाल उपाध्याय असे नामबदल योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने केले आहेत. आता शहरांनंतर योगी सरकारने आपला मोर्चा नद्यांकडे वळवला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये वाहणाऱ्या 'घाघरा' या नदीचं नाव बदलून ते आता 'शरयू' करण्याचा योगी सरकारचा मानस आहे. अवध आणि पूर्वांचल भागातून वाहणाऱ्या या नदीचं नाव बदलून 'शरयू' असं करावं, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. कॅबिनेटकडून याला मंजुरी मिळाली तर घाघरा नदीचं नाव शरयू होण्याची शक्यता आहे. नदी ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे संविधानातील संघ सूचीतील ५६ क्रमांकाच्या कलमानुसार नदीविषयीचे निर्णय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. त्यामुळे योगी सरकार गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच नाव बदलण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
  Print


News - World | Posted : 2020-01-13


Related Photos