महत्वाच्या बातम्या

 विषारी औषध प्राशन केल्याने ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


- नागपूरच्या मेडिकलमध्ये उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास; डुग्गीपार पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : पळसगाव येथील श्रावण नवनाथ पंडाळ (वय ५२) यांचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली होती. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी डुग्गीपार पोलिसांनी प्राप्त कागदपत्रांच्या आधारे आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

अज्ञात कारणातून विषारी औषधाचे सेवन -
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण नवनाथ पंडाळ यांनी १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या गावी अज्ञात कारणातून विषारी औषधाचे सेवन केले. काही वेळातच त्यांची प्रकृती खालावू लागल्याने त्यांना उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात नेण्यात आले.

नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू -
केटीएस रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर श्रावण पंडाळ यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

डुग्गीपार पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद -
या घटनेशी संबंधित कागदपत्रे शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी डुग्गीपार पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे.





  Print






Related Photos