पु. ल. कट्टा उपक्रमात १६ ऑक्टोबरला कलाकाराच्या मनात डोकावताना हा विशेष संवाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंथा / मुंबई : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित पु. ल. कट्टा या कलाकारांच्या हक्काच्या व्यासपीठावर जागतिक मानसिक आरोग्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कलाकाराच्या मनात डोकावताना या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या ५ व्या मजल्यावरील नवीन लघु नाट्यगृहात येथे आयोजित करण्यात आला आहे.
या विशेष संवादात अभिनेते, लेखक, दिग्दर्शक हृषीकेश जोशी आणि समुपदेशक प्राजक्ता गांगल सहभागी होणार असून स्पॉटलाईटपलीकडचे वास्तव, कलाकारांच्या आणि कलाविश्वाशी संबंधित व्यक्तींना मानसिक आरोग्यविषयक येऊ शकणाऱ्या समस्या, त्यावर उपाययोजना याविषयी माहितीपूर्ण उद्बोधन या संवादातून अनुभवायला मिळेल. मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंविषयी जाणून घेण्यासाठी कलाक्षेत्राशी संबंधित व्यक्तिंनी आणि रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.




Petrol Price




