अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्षांचा कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा


- गडचिरोलीचे विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश मेहरे यांचा न्यायनिर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी शुक्रवार, २७ डिसेंबर २०१९ रोजी ठोठावली आहे. हेमंत रामप्रसाद कन्नाके (४०) रा. बोथली (हिरापूर), ता. सावली, जि. चंद्रपूर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हकीकत अशी की, आरोपी हेमंत कन्नाके याने १९ मे २०१६ रोजी पीडित अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून व फूस लावून चामोर्शी येथील बसस्टाॅपवरून हैद्राबाद येथे घेवून गेला व तिथे नेवून पीडितेसाबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन चामोर्शी येथे अपराध क्रमांक ४४/२०१६ भादंविच्या कलम ३७६, ३६३, ३६६ अ, बाललैंगीक अत्याचार कायदा पोक्सो सहकलम गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास चामोर्शी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक पी. यु. कापुरे यांनी पूर्ण करून आरोपीविरूद्ध सबळ पुरावा मिळवून आल्याने दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकारतर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने २७ डिसेंबर २०१९ रोजी आरोपी हेमंत रामप्रसाद कन्नाके यास गडचिरोलीचे विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी भादंवि कलम ३७६, पोक्सो कलम ६ अन्वये १० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, कलम ३६३ अन्वये ५ वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, कलम ३६६ (अ) अन्वये ५ वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान व सहाययक जिल्हा सरकारी वकील एन. एम. भांडेकर यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक पी. यु. कापुरे यांनी केला. पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-27


Related Photos