अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास १० वर्ष सश्रम कारावास


- ३ हजार ५०० रुपयांचा दंडही ठोठावला 
- गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.मेहरे  यांचा  निकाल 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास गडचिरोली येथील  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.मेहरे यांनी १० वर्ष सश्रम कारावास  आणि ३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
प्रमोद देवाजी चापले  रा. पोर्ला ता. जि . गडचिरोली असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.  प्रमोद  चापले हा पोलीस स्टेशन  सिरोंचा येथे नेमणुकीवर असतांना पीडित मुलीच्या  घरी नेहमी जात असायचा.  ३१ मार्च २०१५ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान  पीडित  मुलीला  आरोपीने स्वतः च्या मोटार सायकलवरून शाळेत सोडण्याच्या बहाण्याने आलापल्ली ते सिरोंचा रस्त्यावरील सूर्यापल्ली गावाजवळील पुलाखाली निर्जनस्थळी नेले. या ठिकाणी  तिच्याशी जबरी संभोग तसेच अनैसर्गिक संभोग केला. सदर  बाब कोणासही सांगितल्यास पीडितेला गाडीखाली चिरडून टाकण्याची तसेच   पीडितेच्या वडिलांना बंदुकीची गोळी घालून ठार मारेल अशी  धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलाच्या  तक्रारीवरून पोलीस स्टेशन, सिरोंचा येथे अपराध  कलम ३७६,३७७,५०६ भादंवि तसेच कलम ५,६ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२, ३(१)(१२), ३(२)(५) अनु.जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये आरोपीवर गुन्हा नोंद केला. गुन्ह्याचा तपास  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांचेकडे वर्ग करण्यात आला.  तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले. 
न्यायालयात सरकार पक्षातर्फे १२ साक्षदारांचे बयान नोंदवून न्यायालयाने पीडित मुलीचे बयान व वैद्यकीय अहवाल व इतर परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेऊन तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आज १२ ऑक्टोबर रोजी आरोपीस कलम ३७६ भादंवि सहकलम ६ बा.लै.अ.सं. अन्वये १० वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड, कलम ३७७ भादंवि अन्वये ५ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रु. दंड तसेच ५०६ भादंवि अन्वये १ वर्ष सश्रम कारावास व ५०० रु. दंडाची शिक्षा ठोठावली. 
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम पहिले. गुन्ह्याचा तपास एस.डी.पी.ओ. डॉ. शिवाजी पवार यांनी केला. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून  सपोनि. शरद मेश्राम यांनी काम पहिले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-12


Related Photos