मेक इन गडचिरोली अंतर्गत इच्छूक १०० उद्योजकांना डिक्की करणार मार्गदर्शन : इंजि. मिलींद कांबळे


- मेक इन गडचिरोली जिल्ह्यासाठी महत्वाचा प्रकल्प
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया ही संकल्पना निर्माण केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन आहाराष्ट्र हा प्रकल्प आणला. त्यांच्याच पावलावर पाउल ठेवत गडचिरोलीचे आमदार डाॅ. देवराव होळी यांनी मेक इन गडचिरोली चा संकल्प केला. त्यांचे हे अत्यंत महत्वाचे पाउल आहे. त्यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १०० उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी पाया रोवला आहे. या १०० उद्योजकांना दलित इंडियन चेंबर आॅफ काॅमर्स अॅन्ड इंडस्ट्री म्हणजेच डिक्कीची चमु मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती डिक्कीचे अध्यक्ष इंजिनिअर मिलींद कांबळे यांनी दिली आहे.
गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज १०० आॅक्टोबर रोजी मेक इन गडचिरोली, दलित इंडियन चेंबर आॅफ काॅमर्स अॅन्ड इंडस्ट्री आणि बॅंक आॅफ इंडिया यांच्या वतीने स्टॅंड अप इंयिया क्लिनिक आणि उद्योजकता जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर माहिती देताना पद्मश्री मिलींद कांबळे बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, मेक इन गडचिरोली ही संकल्पना राबविणारे आ.डाॅ. देवराव होळी हे राज्यातील पहिले आमदार आहेत. त्यांनी जिल्हाभर उद्योग क्रांती यात्रा काढून युवकांमध्ये जागृती निर्माण केली. आदिवासी आणि मागास जिल्ह्यात १०० उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. याचाच भाग म्हणून प्रशासनाच्या, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. देशभरात अनेक प्रकल्पात आम्ही काम करीत आहोत. मात्र मेक इन गडचिरोली हा प्रकल्प आमच्यासाठी महत्वाचा आहे. मागास, आदिवासी भागात काम करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील गरजांनुसार शेती आधारित, वनाधारित प्रकल्प या संकल्पनेत आहे. याला स्टॅंड अप इंडिया, नाबार्ड, बॅंका, प्रशासनाचे सहकार्य मिळत आहे. या संकल्पनेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्योजकता योजना जोडलेली आहे. राज्य शासनाने महिला उद्योजकांसाठी सुध्दा स्वतंत्र धोरण जाहिर केले आहे. याचा जिल्ह्यातील उद्योजकांना नक्कीच फायदा होईल, असेही पद्मश्री मिलींद कांबळे म्हणाले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-10


Related Photos