नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. उद्या हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाची आता राज्यसभेत कसोटी लागणार असल्याचं दिसत आहे.
कलम ३७०  रद्द करणाऱ्या विधेयकाप्रमाणेच नागरिकत्व दुरूस्ती विधेयकही महत्त्वाचं असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीदरम्यान व्यक्त केलं होतं.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पास झाल्यास इतर देशांमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीय नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळवणं सोपं होणार आहे. मुस्लीम बहुल देशांमध्ये इतर धर्माच्या लोकांवर अन्याय होतो. त्यामुळे अशा लोकांना भारतात येणं शक्य होणार आहे.
दरम्यान, नागरिकत्व दुरूस्ती विधेयकामध्ये मुस्लीम धर्माचा समावेश नसेल. यापूर्वी विरोधी पक्षांनी नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला विरोध केला होता.  Print


News - World | Posted : 2019-12-04


Related Photos