नारकसा येथे पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीची दंडाधिकारीय चौकशी सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती (पोलीस स्टेशन, कोरची) अंतर्गत नारकसा जंगल परिसरात 15 सप्टेंबर 2019 ला पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये सशस्त्र चकमक झाली होती. त्यात शोध मोहिमेदरम्यान घटनास्थळावर एक महिला व एक पुरुष मृतदेह शस्त्रासह सापडले. सदर मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 176 अन्वये चौकशी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, कुरखेडा यांची नियुक्ती केली आहे. सदरील घटनेबाबत कोणत्याही व्यक्तीस माहिती असल्यास घटनास्थळी, प्रत्यक्षदर्शी असल्यास त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे निवेदन 15 डिसेंबर 2019 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, कुरखेडा कार्यालयास समक्ष सादर करावे किंवा कोणालाही याची माहिती असल्यास उप विभागीय दंडाधिकारी, कुरखेडा यांचे समक्ष शपथेवर निवेदन 15 डिसेंबर 2019 पर्यंत देऊ शकतात, असे उपविभागीय दंडाधिकारी, कुरखेडा यांनी कळविले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-29


Related Photos