१७ वर्षीय इसमाची नक्षल्यांनी केली हत्या ; कोरची तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
तालुक्यातील भिमनखोजी येथील इसमाची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून अज्ञात नक्षल्यांनी २७ नोव्हेंबर रोजी हत्या केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.  मनोज दयाराम हिळको (१७) रा. भीमनखोजी असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेसंदर्भात कोरची पोलीस ठाण्यात अज्ञात नक्षल्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अठरा दिवसानंतर तालुक्यात दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-29


Related Photos