महत्वाच्या बातम्या

 मुलींच्या आरोग्याबाबत इनरव्हील क्लबचा जागरूकता उपक्रम


- एक्सलेंट अकॅडमी ऑफ सायन्स येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने इनरव्हील क्लबच्या वतीने एक्सलेंट अकॅडमी ऑफ सायन्स, वरोरा येथे मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉक्टर सौ. उमरे यांनी विद्यार्थिनींना आरोग्याची काळजी, किशोरवयातील शारीरिक बदल, मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता व योग्य काळजी, संतुलित आहार तसेच आरोग्याशी संबंधित समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मुलींनी आपल्या आरोग्याविषयी कोणतीही समस्या किंवा शंका मनात न ठेवता पालक, शिक्षक किंवा डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद साधावा, असे आवाहन डॉक्टर सौ. उमरे यांनी केले. विद्यार्थिनींनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. इनरव्हील क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. मुलींचे आरोग्य ही कुटुंब आणि समाजाची महत्त्वाची जबाबदारी असून, योग्य वयात योग्य आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाला इनरव्हील क्लब वरोरा अध्यक्ष स्नेहल पत्तिवार, ८ प्राजक्ता कोहळे, नीलिमा गुंडावार, प्रिया टोंगे इत्यादी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एक्सलंट अकॅडमी चे डायरेक्टर अभय टोंगे, सौ प्रिया टोंगे, सर्व  शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी  आणि विद्यार्थी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले





  Print






Related Photos