महत्वाच्या बातम्या

 निरपराध नागरिकांची बळी घेणाऱ्या त्या रानटी हत्तीची तात्काळ बंदोबस्त करा : अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारू


- काँग्रेसचे युवा नेते कंकडालवार यांनी दिली वनविभागाला गंभीर इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : तेलंगणा राज्यात दोन जणांचा बळी घेतलेल्या रानटी हत्तीने गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर गुरूवारी एका शेतकऱ्याचा बळी घेतला. गेल्या १८ दिवसांपासून सिरोंचा वनविभागात असलेला हा हत्ती नुकताच भामरागड वनविभागात दाखल झाला होता. या रानटी हत्तीने अनेक शेतातील पिकांचेही नुकसान केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील रानटी हत्तींच्या कळपातून भरकटत तेलंगणात गेलेल्या या हत्तीने सीमावर्ती भागातील जिल्ह्यात दोन जणांचा बळी घेतला. त्यानंतर हा हत्ती पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. सिरोंचा वनविभागाअंतर्गत रेपनपल्ली वनपरिक्षेत्रात १८ दिवस भटकंती केल्यानंतर हा हत्ती भामरागड वनविभागाच्या जंगलात दाखल झाला होता. यादरम्यान गुरूवारी भामरागड तालुक्यातील कियर येथील गोंगलू रामा तेलामी (५३) या शेतकऱ्याचा हत्तीने बळी घेतला. सदर रानटी हत्तीने पेरमिली वनपरिक्षेत्रातील शेतातल्या घरांचे आणि पिकांचेही नुकसान केले आहे.

त्या रानटी हत्तीचा बंदोबस्त करा-  अजय कंकडालवार

गेल्या २ वर्षांपासून रानटी हत्तींनी जिल्ह्यात हैदोस माजवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. काही महिन्यांपासून या रानटी हत्तीच्या हालचाली कमी झाल्या होत्या, मात्र मागील २-४ दिवसात या रानटी हत्तींच्या हालचाली पुन्हा सुरू होऊन काही नागरिकांचा जीवही गेला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहफूल गोळा करण्यापासून तर तेंदपुत्ता संकलनाचा हंगाम सुरु झाला असल्याने नागरिकांना जंगलात जावे लागते. त्यामुळे वन प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाय करून रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा.

अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारू आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वनविभागाला मागणी करत गंभीर इशारा दिली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos