महत्वाच्या बातम्या

 मतदानासाठी येणाऱ्या स्तनदा मातांनी हिरकणी कक्षाचा लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी येणाऱ्या स्तनदा मातांसाठी आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ३२ आयुष्यमान आरोग्य मंदीर, १८३ ग्रामीण आरोग्य वर्धिनी केंद्र तसेच ३४ शहरी आरोग्य केंद्रामध्ये स्वतंत्र हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली असून स्तनदा मातांनी हिरकणी कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

उष्माघात झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे, यासाठी जिल्ह्यातील ३२ आयुष्यमान आरोग्य मंदीर, १८३ ग्रामीण आरोग्य वर्धिनी केंद्र तसेच ३४ शहरी आरोग्य केंद्रामध्ये शितकक्षाची सुध्दा स्थापना करण्यात आली आहे. तसेच मतदारांची अचानक तब्येत बिघडल्यास उपचारासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आशा स्वयंसेविका यांच्याजवळ प्रथमोपचार किट उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

मतदान केंद्रावरील सुविधा -

मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, प्रतीक्षा शेड, वैद्यकीय किट, केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने प्रवेश सुविधा, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि साइन बोर्ड असतील. तसेच मतदान केंद्रावर स्वयंसेवक सहाय्य देखील उपलब्ध असणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos