भंडारा जिल्ह्यात घर कोसळून पती, पत्नी व मुलगी ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
जिल्ह्यातील राजेदाहे गावात  मुसळधार पावसामुळे  घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  सकरू खंडाते (३२), सारिका खंडाते (२८) आणि सुनक्याना खंडाते (३) अशी मृतांची नावे आहेत.   
पावसामुळे भंडारा  जिल्ह्यातील नदी-नाले भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. लोकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. येत्या २४ तासांत पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ दारे एक मीटरने उघडण्यात आली आहेत. यातून २,४४,३०९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग जात आहे.    Print


News - Bhandara | Posted : 2018-08-21


Related Photos