मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी, याउद्देशाने २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६ वाजता जिल्हा क्रिडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वर्धा येथे स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल रॅलीची सुरूवात जिल्हा क्रिडा संकुल येथून होणार असून महात्मा गांधी पुतळा, विश्रामगृह, आरती चौक, धूनिवाले मठ, आर्वी नाका, बॅचलर रोड, शास्त्री चौक, बजाज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व जिल्हा क्रीडा संकुल येथे समारोप होणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनामध्ये मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, युवती व नागरिकांनी सायकल रॅली मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांनी केले आहे.
News - Wardha