महत्वाच्या बातम्या

 एचडीएफसीचा जबरदस्त निकाल : महसूल ८०७ अब्ज रुपयांवर, डिविडेंड देण्याची घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने जानेवारी- मार्च २०२४ तिमाही आणि आर्थिक वर्ष २०२४ चे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च २०२४ च्या तिमाहीत बँकेचा एकत्रित निव्वळ महसूल वार्षिक १३३.६ टक्क्यांनी वाढून ८०७ अब्ज रुपये झाला आहे.

एका वर्षापूर्वी ते ३४५.५ अब्ज रुपये होता. या तिमाहीत बँकेचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक ३९.९ टक्क्यांनी वाढून १७६.२ रुपये झालाय. निकाल जाहीर करताना कंपनीने १९.५ रुपयांचा डिविडंड देण्याचीही घोषणा केली.

बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार स्टँडअलोन आधारावर, मार्च २०२४ तिमाहीत एचडीएफसी बँकेचा निव्वळ महसूल वार्षिक ४७.३ टक्क्यांनी वाढून ४७२.४ अब्ज रुपये झाला आहे. यामध्ये सब्सिडायरी एचडीएफसी क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमधील हिस्स्याच्या विक्रीतून ७३.४ अब्ज रुपयांच्या व्यवहारातील नफ्याचाही समावेश आहे. या तिमाहीत स्टँडअलोन निव्वळ नफा वाढून १६५.११ रुपये अब्ज झाला आहे जो एका वर्षापूर्वी १२०.४७ अब्ज रुपये होता.

व्याजातून मिळणारे उत्पन्न वाढले -

या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न २४.५ टक्क्यांनी वाढून २९०.८ अब्ज रुपयांवर पोहोचले आहे, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत २३३.५ अब्ज रुपये होते. इतर उत्पन्न म्हणजेच बिनव्याजी महसूल १८१.७ अब्ज रुपये नोंदवला गेलाय, जो एका वर्षापूर्वी ८७.३ अब्ज रुपये होता.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये नफा किती?

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये बँकेचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक ३९.३ टक्क्यांनी वाढून ६४०.६ अब्ज रुपये झालाय. स्टँडअलोन आधारावर निव्वळ नफा ६०८.१ अब्ज रुपये राहिला, जो तुलनेत ३७.९ टक्क्यांनी वाढला. या काळात स्टँडअलोन निव्वळ महसूल १५७७.७ अब्ज रुपये होता, जो एका वर्षापूर्वी ११८०.६ अब्ज रुपये होता.





  Print






News - World




Related Photos