महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : १२- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या मतदान पक्रियेत एकूण ७१.८८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी आमगाव विधानसभा मतदार संघात ६९.२५ टक्के, आरमोरी ७३.६९ टक्के, गडचिरोली ७१.४२ टक्के, अहेरी ६६.९३ टक्के, ब्रम्हपुरी ७५.१० टक्के तर चिमुर विधानसभा मतदारसंघात ७४.४१ टक्के मतदान झाले. 

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लक्ष १७ हजार ७०२ मतदार आहे. यात ८ लक्ष १४ हजार ७६३ पुरुष मतदार, ८ लक्ष २ हजार ४३४ स्त्री मतदार तर १० इतर मतदार आहेत. 

यापैकी ५ लक्ष ९५ हजार २७२ पुरुष मतदारांनी (७३.०६ टक्के), ५ लक्ष ६७ हजार १५७ स्त्री मतदारांनी (७०.६८ टक्के) तर ५ इतर नागरिक असे ११ लक्ष ६२ हजार ४३४ (७१.८८ टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos