महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२१ एप्रिल महत्वाच्या घटना

७५३ : ७५३ ईसा पूर्व: रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)

१९६० : रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.

१९७२ : अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.

१९९७ : भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.

२००० : आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.

२१ एप्रिल जन्म

१८६४ : जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९२०)

१९२२ : स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७)

१९२६ : इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचा जन्म.

१९३४ : महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचा जन्म.

१९४५ : भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांचा जन्म.

१९५० : हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म.

२१ एप्रिल मृत्यू

१५०९ : इंग्लंडचा राजा हेन्‍री (सातवा) यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १४५७)

१९१० : अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५)

१९३८ : पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ सर मुहम्मद इक्बाल यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)

१९४६ : ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८३)

१९५२ : इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८८९)

२०१३ : गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos