महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात १८ लक्ष ३७ हजार ९०६ मतदार


- मतदान साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लक्ष ३७ हजार ९०६ मतदार आहे. यात ९ लक्ष ४५ हजार ७३६ पुरुष मतदार, ८ लक्ष ९२ हजार १२२ स्त्री मतदार तर ४८ इतर मतदार आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ७० – राजुरा, ७१ – चंद्रपूर, ७२ – बल्लारपूर, ७५ – वरोरा, ७६ – वणी आणि ८० – आर्णि या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राजूरा मतदारसंघात ३३० मतदान केंद्र, चंद्रपूर मतदारसंघात ३८३ मतदान केंद्र, बल्लारपूर मतदारसंघात ३६१ मतदान केंद्र, वरोरा मतदारसंघात ३४० मतदान केंद्र, वणी मतदारसंघात ३३८ मतदान केंद्र तर आर्णि मतदारसंघात ३६६ मतदान केंद्र असे एकूण २११८ मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर मतदानाचे संपूर्ण साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना झाल्या आहेत.

टोकन सुविधा : उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांकरीता निवारा / प्रतिक्षालय तयार करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रावर गर्दीची परिस्थिती उद्भवून मतदारांना अडचण होणार नाही, याकरीता टोकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तिंसाठी उपाययोजना : जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदाराकरीता त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून मतदारांच्या मदतीकरीता मदतनीस / स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos