महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा (रै.) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा (रै.) येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तावडे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गीताशेंडे प्रमोद बोरसरे, गुरुदास सोनटक्के, अंजली तंगडपलीवार, विजय दुधबावरे, अनिल दुर्गे, अभिषेक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमात गीता शेंडे, प्रमोद बोरसरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. 

यावेळी शालेय विद्यार्थ्यांन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यातील प्रसंगावर आधारित भाषणे केली. सोबतच विद्यार्थ्यांनी काढलेल्या बाबासाहेबांच्या चित्रांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी भिमगीते गाऊन दाखविली. अध्यक्ष म्हणून बोलताना तावडे यांनी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून आपली वाटचाल यशस्वी करावी, असे आवाहन केले. बाबासाहेबांचा अभ्यास जिद्द, चिकाटी, सातत्य, आत्मविशवास, राष्ट्रनिष्ठा व त्यांनी आयुष्यात बाळगलेली शिस्त समर्पण यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आयुष्यभर पाळावा, असे मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद बोरसरे यांनी तर सूत्रसंचालन विजय दुधबावरे व आभार प्रदर्शन अनिल दुर्गे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ चॉकलेट व मिठाईचे वितरण करण्यात आले. याप्रसगी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना पंचप्राण प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल वडेट्टीवार जगदीश वैरागडे यांनी मोलाचे सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos