महत्वाच्या बातम्या

 क्षेत्रिय अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या प्रयोजनार्थ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नेमलेल्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (सन १९७४ चा २) चे कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना १९ एप्रिल २०२४ च्या सायंकाळी ६ वाजेपासून २६ एप्रिल २०२४ या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १२९, १३३, १४३ आणि १४४ अन्वये विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.





  Print






News - Wardha




Related Photos