महत्वाच्या बातम्या

 मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला देवळी विधानसभा मतदार संघाचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाने ०८ वर्धा लोकसभा मतदार संघासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून अभय नंदन अंबास्था यांची नियुक्ती केली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून अभय नंदन अंबास्था यांनी देवळी तहसील कार्यालयास भेट दिली व निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.

देवळी विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, तहसीलदार दत्तात्रय जाधव, सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी प्रसाद कुळकर्णी, संपर्क अधिकारी दिपक वाघ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

देवळी विधानसभा मतदार संघात २ लाख ६६ हजार ५७२ मतदार आहे. दिव्यांग आणि ८५ वर्षावरील मतदारांचे गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी १० पथके कार्यरत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सिव्हीजील वरील तक्रारींची माहिती, नवमतदार, मागील निवडणुकीत मतदानाची टक्केवारी, स्वीप अंतर्गत मतदानाची टक्के वाढविण्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, निवडणुकीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, महिला मतदान केंद्र आदींचा सविस्तर आढावा मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला.

बैठकीनंतर नियंत्रण कक्ष, तक्रार नियंत्रण कक्ष, आचार संहिता कक्ष, स्ट्राँग रूम, निवडणूक साहित्य स्वीकार व वितरण कक्ष, एस.एस.टी., एफ.एस.टी. व्ही.एस.टी. आदी पथकांना भेट देऊन पाहणी केली.





  Print






News - Wardha




Related Photos