महत्वाच्या बातम्या

 निवडणूक निरीक्षकांचा महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील नागरिकांसोबत संवाद


- मतदान केंद्राला भेट व पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : १३ - चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल २०२४ रोजी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. या तयारीची पाहणी करण्याकरिता सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी जीवती तालुक्यातील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या मतदान केंद्राला यांनी भेट दिली. तसेच येथे कार्यरत कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधला.

महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील अंतापूर, पद्मावती, इंदिरानगर, पळसगुडा, येसापूर, भेलापठार, लेंडीगुडा, येसापूर (नारायणगुडा), शंकरलोधी, महाराजगुडा, कोठा (बु.), परमडोली, मुकदमगुडा आणि लेंडीजाळा या १४ गावांसाठी एकूण सहा मतदान केंद्र राहणार आहेत. यातील पुडीयालमोहदा आणि परमडोली या मतदान केंद्राला निवडणूक निरीक्षक जाटव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पोलिस पाटील व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. निवडणूक संदर्भात काही अडचण आहे का, दोन्ही राज्यासाठी मतदान करता का, मतदार माहिती चिठ्ठी मिळाल्या का, याबाबत त्यांनी नागरिकांना विचारणा केली. यावेळी जीवतीचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड, नायब तहसीलदार वाहने, तलाठी मेटलवार आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

मतदान केंद्रनिहाय मतदार संख्या :  महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील १४ गावांसाठी असलेल्या सहा मतदान केंद्रातंर्गत २ हजार ६९४ पुरुष मतदार तर २ हजार ४२३ स्त्री मतदार असे एकूण ५ हजार ११७ मतदार आहेत. यात पुडीयालमोहदा मतदान केंद्रातंर्गत एकूण ७२२ मतदार (पुरुष – ३७४, स्त्री - ३४८), कुंभेझरी मतदान केंद्रातंर्गत एकूण १ हजार ४३५ मतदार (पुरुष – ७५५, स्त्री - ६८०), भोलापठार मतदान केंद्रातंर्गत एकूण ८३१ मतदार (पुरुष – ४३६, स्त्री - ३९५), वणी (खु.) मतदान केंद्रातंर्गत एकूण ६१२मतदार (पुरुष – ३२४, स्त्री - २८८), महाराजगुडा मतदान केंद्रातंर्गत एकूण ३०१ मतदार (पुरुष – १५२, स्त्री - १४९) आणि परमडोली मतदान केंद्रांतर्गत एकूण १ हजार २१६ मतदार (पुरुष – ६५३ , स्त्री - ५६३) आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos