महत्वाच्या बातम्या

 गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत विजयाची गुढी उभारून विजयी संकल्प करा : खा. अशोक नेते


- आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन : मंत्री धर्मराव बाबा आत्राम 

- आरमोरी, पोर्ला, साखरा या विविध ठिकाणी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ काल ०९ एप्रिल २०२४ रोज मंगळवारी (गुढीपाडवा) मराठी नववर्षा निमित्याने तालुका आरमोरी येथे प्रकाश साव. पोरेड़्डीवार यांच्या निवासस्थानी व पोर्ला येथे शिव मंदिर सभागृहात तसेच साखरा अशा विविध ठिकाणी महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करून पार पडला. 

यावेळी खा. नेते यांनी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतांना म्हणाले भारताची जागतिक विकासाकडे वाटचाल सुरू आहे. केंद्रातुन अनेक विकास कामे प्रयत्नाने मंजूर करून घेण्यात सिंहाचा वाटा आहे. एवढेच नाहीतर रेल्वे सर्व्ह लाईन चे सुद्धा काम मंजूर केलेले आहे. याबरोबरचे वडसा गडचिरोली रेल्वे लाईन चे काम प्रगती पथावर सुरु आहे. यासाठी काल गुढीपाडव्याच्या निमित्याने विजयाची गुढी उभारून विजय संकल्प करत येणाऱ्या १९ एप्रिल ला कमळाच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने मतांनी विजयी करा, असे प्रतिपादन खा. नेते यांनी महायुतीच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केले.

याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून आगामी लोकसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवण्याचे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

या कार्यकर्ता महायुतीच्या मेळाव्याला प्रामुख्याने सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी, लोकसभा प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, माजी आमदार हरिराम वरखडे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमीन लालानी, शिवसेनेचे नेते हेमंत जम्बेवार, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, राष्ट्रवादीचे नेते रिंकू पापडकर, शिवसेनेच्या अमिता मडावी, जिल्हा सचिव नंदू पेठ्ठेवार, पं.स. सभापती मारोतराव ईचोडकर, माजी पं.स. उपसभापती विलास देशमुखे, भारत बावणथडे, पवन नारनवरे, शहराध्यक्ष विलास पारधी, सामाजिक नेते नंदु काबरा, विश्व शांतीदुत प्रकाश अर्जूनवार, मधुकर भानारकर, महिला मोर्चाच्या अर्चना बोरकुटे तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos