चामोर्शी तालुक्यातील ४१ जणावर तडीपारीची कारवाई


- १९ ते २१ ऑक्टोबर पर्यंत चामोर्शी तालुक्यात वास्तव्यास मनाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
येत्या २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान असल्याने शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या हेतुने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने चामोर्शी तालुक्यातील ४१ जणावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांना १९ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत चामोर्शी तालुक्याच्या हद्दीत वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
यामध्ये प्रमोद नारायण मंडल  चामोर्शी , मंगला देवानंद वालदे चामोर्शी , जगदीश सोमेश्वर आत्राम चामोर्शी, घनशाम मारोती शेट्टे चामोर्शी, राहुल श्रावण गोलाईन चामोर्शी, अजय बाळकृष्ण बन्सोड चामोर्शी, रविन्द्र साबय्या सिध्देंकीवार चामोर्शी, राकेश मधुकर येग्लोपवार भेंडाळा, पंढरी चिरकुटा भोयर भेंडाळा, विठ्ठल दोडकु गेडाम वाघोली, परशुराम समय्या गोडसेलवार फराडा, सुनिल सुखदेव कुसराम कान्होली, संतोष किसन शेट्टे चामोर्शी, आकाश रमेश सोनटक्के चामोर्शी,रितु डाकुआ चामोर्शी, मनोज पांडूरंग शातलवार चामोर्शी, प्रमोद देविदास लाड चामोर्शी, रमेश शामराव सदुलवार चामोर्शी, उषा अरूण सरकार चामोर्शी, राकेश राजकुमार परीहार चामोर्शी, सुब्रत सुभाष ढाली क्रिष्णानगर, विकास नीलकमल ' मंडल नवग्राम, रंगो रतन दास नवग्राम, विलास मार्कंडी कोपूलवार राजनगट्टा, शामराव कवडू मोगरकर सोनापूर, सोमेश्वर केशव खांडेकर गोवर्धन, शंकर सुखदेव रॉय भिक्सीबोरी, स्वप्नील खुशाल बारसागडे हिवरगाव, मुखरू कुकसू शेरखी तळोधी, वैयजंती गौतम निमगडे तळोधी, निराशा साईनाथ बावणे कुनघाडा, माया डोमाजी कोसरे कुनघाडा, रामभाऊ गुनाजी वाघाडे कुनघाडा, प्रिती उमेश रामटेके कुनघाडा, सुनिता सपन मंडल कुनघाडा,  किशोर झुंगाजी उडाण उमरेड, देब्रत सुभाष ढाली क्रिष्णानगर, शांती साजन राजवंशी नवग्राम, मिथुन निर्मल मिश्रा, बंडू जानकिराम ताकसांडे हळदीचक आणि गंगाधर लक्ष्मण बुरांडे दहेगाव यांचा समावेश आहे. 
या सर्व ईसमावर उपविभागीय पोलिस अधिकारी एम.सुदर्शन यांच्या आदेशान्वये  सीआरपीसी कलम १४४(२) अन्वये कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी दिली.यापैकी कुणी चामोर्शी पोलिस 'ाण्याच्या हद्दीत आढळून आल्यास चामोर्शी पोलिस  ठाण्यास माहिती देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-19


Related Photos