महत्वाच्या बातम्या

 मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांची वडकी चेकपोस्टला भेट व पाहणी


- हिंगणघाट विधानसभेचा घेतला आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेग आला असून ०८ वर्धा लोकसभा मतदार संघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी हिंगणघाट तालुक्यातील वडकी चेकपोस्टला भेट दिली व पाहणी केली. चेकपोस्टवरील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अलर्ट राहावे तसेच सर्व वाहनांची कसून तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले, हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मासाळ, समुद्रपूरचे तहसीलदार कपील हाटकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, संपर्क अधिकारी वाघ यांच्यासह विविध नोडल अधिकारी उपस्थित होते.

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या कामाचे नियोजन तसेच कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदार, नवमतदार, दिव्यांग मतदार तसेच ८५ वर्षावरील मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच निवडणुकीच्या कामकाजासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आदींचा सविस्तर आढावा मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी यावेळी घेतला.

मागील निवडणुकीत झालेल्या मतदानाची माहिती व लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून केलेल्या कार्यक्रमांची तसेच उपाय योजनांची माहिती त्यांनी यावेळी घेतली. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर मतदारांना सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.





  Print






News - Wardha




Related Photos