महत्वाच्या बातम्या

 जम्मू- कश्मीर- उरीमध्ये घुसखोरीचा डाव जवानांनी उधळला : एका दहशतवाद्याला कंठस्नान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा डाव सुरक्षा जवानांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानच्या बाजूने काही दहशतवादी हिंदुस्थानमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसताच अलर्ट जवानांनी त्यांना रोखले.

यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी जशास तसे प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला टीपले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

उरी सेक्टरमधील सबुरा नाला रुस्तम येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जवानांना संशयास्पद हालचाल दिसून आली होती. त्यानंतर जवानांनी घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. याला जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला असून येथे अद्यापही धुमश्चक्री सुरू असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, गुरुवारी राजौरी जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी संशयित दिसल्याची माहिती मिळताच पोलीस, लष्करी जवान आणि सीआरपीएफने शोधमोहीम सुरू केली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत शोधमोहिमेत यश मिळाले नाही. थन्नामंडी तालुक्यात येणाऱ्या डोरी माल जंगलामध्ये दुपारच्या सुमारास तीन संशयित दिसल्याची माहिती खबऱ्याने सुरक्षा दलाला दिली होती. त्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे.





  Print






News - World




Related Photos