महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना तरुण तेजांकित पुरस्काराने सन्मानित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : समाजाचे विविध प्रश्न असून त्यांना सोडविण्यासाठी प्रशासनाची महत्वाची भूमिका आहे. समाजाचे प्रश्न सोडवितांना प्राथमिक प्रश्न तात्काळ सोडविणे. लोकाभिमुख प्रशासन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, लोकसेवा गतिमान व प्रभावी करण्याचा प्रयत्न या कार्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना लोकसत्ता तरुण तेजांकित- २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नुकताच मुंबई येथे लोकसत्ता तरुण तेजांकित-२०२३ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले लोकसेवा गतिमान आणि प्रभावी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सेवादूत उपक्रमात राज्यात पहिल्यांदाच नागरिकांना शासकीय सेवा घरपोच दिल्या गेल्या. शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळण्यासाठी कृषी माल आयात निर्यातीचा परवाना देण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या सेवेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले. जिल्ह्यात नवउद्योजकांसाठी इंक्यूबेशन कम बिजनेस फॅसीलीटेशन सेंटर उभारण्यात आले. सीएसआरच्या माध्यमातून २०० शाळांमध्ये ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली, अशी अनेक लोकाभिमुख कामे प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवित आहे. जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या कार्याची दखल घेत कायदा व धोरण यासाठी लोकसत्ता तरुण तेजांकित- २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे, यामुळे प्रत्यक्ष पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहू शकलो नाही. परंतु, लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले, त्यामुळे अतिशय आनंद होत आहे. पुरस्कारासाठी लोकसत्ता समुहाचे मी आभार व्यक्त करतो. - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले





  Print






News - Wardha




Related Photos