महत्वाच्या बातम्या

 भरधाव येणाऱ्या दुचाकीने एर्टिगा कारला दिली धडक : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव या गावनाजिक सायंकाळी सुमारे ५:३० च्या दरम्यान कुरखेडा मार्गाहून कोरची कडे भरधाव वेगाने जाणारी सी जी ०८  ई ८९७२ क्रमांकाच्या दुचाकीने समोरून येणाऱ्या एर्टिगा वाहणाला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की या धडकेमध्ये दुचाकिस्वार याचा जागीच मृत्यू झाला असून एर्टिगा क्रमांक MH ३३ AC ४६३५ ही पंचायत समिती येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची असून ते कोरची ते देसाईगंज नियमित प्रमाणे ये - जा करीत असताना ही घटना घडली.  
पुढील तपास पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत केले जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos