महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३० मार्च महत्वाच्या घटना

१६६५ : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

१७२९ : थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१८४२ : अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

१८५६ : पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

१९२९ : भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.

१९३९ : हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.

१९४४ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

३० मार्च जन्म

१८५३ : डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९०)

१८९४ : इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७७)

१८९५ : सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५)

१८९९ : बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९७०)

१९०६ : भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)

१९०८ : अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९९४)

१९३८ : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब यांचा जन्म.

१९४२ : भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.

१९७७ : भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे यांचा जन्म.

३० मार्च मृत्यू

१९५२ : भूतानचे २ रे राजे जिग्मे वांगचुक यांचे निधन.

१९६९ : कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

१९७६ : चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

१९८१ : रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते डेविट वलास यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८९)

१९८९ : सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)

२००२ : गीतकार आनंद बक्षी यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९२०)

२००५ : भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९३०)

२०१२ : कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos