महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी ई- पिक पाहणी वर नोंद करावी 


- पिक पेरा नोंदवावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाचा ई-पिक पाहणी हा महत्वकांशी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. सन २०२३-२४ खरीप व रब्बी हंगामात १७८६७३, १६५३३ शेतकऱ्यांनी १५८५३४.७४ हेक्टर आर क्षेत्राची ई पिक पाहणी ॲपद्वारे पिकाची नोदणी केलेली आहे. केंद्र शासनातर्फे सन २०२३-२४ खरीप व रब्बी हंगामा करिता भंडारा जिल्ह्यातील दुधारा, नागणगाव, सिंगोरी व निलजखुर्द गावात डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) व्हर्जन ३ मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी २७०१६.४१ हेक्टर आर क्षेत्राची ई- पिक पाहणी केली. 

उन्हाळी हंगाम २०२३-२४ ची ई. पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवण्याची कार्यवाही १ एप्रिल २०२४ पासून सुरू होत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सन २०२४ उन्हाळी हंगामा करिता डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) व्हर्जन ई- पिक पाहणी करीता पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्याकडे जुने व्हर्जन २ ई- पिक पाहणी ॲप असल्यास अपडेट करावे तसेच ज्या शेतकऱ्याकडे ई-पिक पाहणी ॲप नसल्यास त्यांनी प्लेस्टोर ई-पिक पाहणी व्हर्जजन डाऊनलोड करावे. 

शेतकऱ्यांनी १५८५३४.७४ हेक्टर आर क्षेत्राची ईपिक पाहणी ॲपद्वारे पिकाची नोदणी केलेली आहे. केंद्र शासनातर्फे सन २०२३-२४ खरीप थी हंगामा करिता भंडारा जिल्ह्यातील धारा, नागणाम, सिगीरी व निलनपूर्व गावात डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) पार्जन मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी २७०१६.४१ हेक्टर आर क्षेत्राची ई- पिक पाहणी केली. 

उन्हाळी हंगाम २०२३-२४ ची ई. पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवण्याची कार्यवाही १ एप्रिल २०२४ पासून सुरू होत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सन २०२४ उन्हाळी हंगामा करिता डिजिटल फ्रॉप सर्वे (DCS) ई- पिक पाहणी करीता पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जुने व्हर्जन र ई- पिक पाहणी अप असल्यास अपडेट करावे. तसेच ज्या शेतऱ्यांकडे ई पिक पाहणी ॲप नसल्यास त्याने प्लेस्टोर ई पिक पाहणी वाजैन ३ ॲप डाऊनलोड करावे.

- शेतकऱ्यांनी स्वतः आपला पीक पेरा नोंदविण्याचे फायदे

शेतकऱ्यांनी केलेली ई- पिक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येणार. शेतकऱ्यांनी ई- पिक पाहणी द्वारे नोंदवलेल्या पिकाबाबत आज्ञावली मध्ये स्वयंघोषणापत्र घेतले जाणार असून अशा रीतीने शेतकन्यांनी केलेली पिक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येऊन तो गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहे.

- किमान तपासणी तलाठी यांच्यामार्फत होणार

वरील प्रमाणे शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणी पैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठी यांच्यामार्फत करण्यात येणार असून त्यामध्ये पिकाचा फोटो नसलेल्या नोंदी चुकीचा फोटो असलेला नोंदी व विहित अंतराच्या बाहेरून घेतलेले फोटो अशा नोंदीचा समावेश असणार आहे. तलाठी हे पडताळणी अंत्य आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.

- ४८ तासात खातेदारास स्वतः पीक पाहणी दुरुस्ती सुविधा 

शेतऱ्यांनी ई- पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी अशी पीक पाहणी नोंदविल्या पासून ४८ तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.

- किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदविण्याची सुविधा

किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकांची ई- पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास ई- पिक ॲपमध्येच शेतकऱ्याला आपणास किमान आधारभूत किमान योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे काय? असा प्रश्न विचारला जाणार आहे. शेतकऱ्यांनी होय असल्यास होय असा पर्याय निवडल्यास अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब आद्यावलीद्वारे विभागाला दिली जाणार असून त्यामध्ये पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे.

त्यामु्ळे शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवयश्यता भासणार नाही.

- संपूर्ण गावाची पिक पाहणी पाहण्याची सुविधा

संपूर्ण गावाची पिकांची नोंदणी बंघता आल्यामुळे नैसर्गिक आपत्ती येऊन पिकांची नुकसान झाल्यास ॲप मधील पिकाच्या नोंदणी शेतकऱ्यांला फायदेशीर ठरतील.

उन्हाळी हंगाम २०२३-२४ ची ई. पिक पाहणी कार्यवाही १ एप्रिल २०२४ पासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच ई- पिक पाहणी व्हर्जन ३ मोबाईल ॲप गुगल प्लेस्टोर वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सर्व शेतकऱ्यांनी हे मोबाईल ॲप आपल्या माबाईल मध्ये डाऊनलोड करुन उन्हाळी हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी असे आवाहन कण्यात येत आहे. पिक पाहणी करताना अडचणी आल्यास ०२०-२५७११७१२ या टोल फ्री क्रमांक वर कॉल करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी, महसूल विभागानी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos