महत्वाच्या बातम्या

 रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा अर्ज दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज ६ अर्ज स्वीकारण्यात आले. रामटेकसाठी एकूण दाखल अर्जांची संख्या ७ झाली आहे.

रामटेकसाठी गोवर्धन सोमदेवे (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), उमेश खडसे (राष्ट्र समर्पण पार्टी), शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी), संदीप गायकवाड (अपक्ष), आशिष सरोदे (भीमसेना) यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण ७ अर्ज दाखल करण्यात आले रामटेकसाठी आज ४२ अर्जांची उचल करण्यात आली. आतापर्यंत रामटेकसाठी एकूण २०५ अर्जांची उचल करण्यात आली.   

नामनिर्देशनपत्रे २७ मार्चपर्यंत सकाळी ११ ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. २८ मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos